एका अतूट विश्वासाची साद
“जेव्हा साधी सावलीही सोबत सोडते, तेव्हा तो ‘सावळा’ पाठीशी उभा राहतो. संकटाच्या काळोखात प्रकाशाची ठिणगी बनून वाट दाखवणाऱ्या कृष्णाप्रती असलेला एक अतूट विश्वास.”
कृष्ण, तू आहेस ना सोबतिला,
या शांततेतही तुझं अस्तित्व जाणवतं,
सावलीसारखा तू माझ्या पाठीशी,
अंधारातही तूच मला प्रकाश देतोस।
तू आहेस ना, जेव्हा डोळ्यांत पाणी येतं,
माझं दुःख सावरायला, हसवायला,
अश्रूंच्या त्या ओघळलेल्या क्षणातही,
तुझं हास्य मला सावरणारं ठरतं।
तू आहेस ना सोबतिला, जेव्हा वाट हरवते,
काळोखात प्रकाशाची ठिणगी बनून,
तूच मला योग्य मार्ग दाखवतोस,
तूच माझ्या मनाचा आधार बनतोस।
कृष्ण, तू आहेस ना सोबतिला,
माझ्या प्रत्येक श्वासात तुझी चाहूल,
तू आहेस जिथे विश्वासाची तळमळ,
तिथेच माझं मस्तक तुझ्या चरणी झुकतं।
आयुष्याच्या प्रवासात अनेकदा आपण हतबल होतो, पण ही कविता आपल्याला आठवण करून देते की आपण कधीच एकटे नसतो. तो ‘कृष्ण’ आपल्या प्रत्येक श्वासात आणि विश्वासात सामावलेला आहे. हाच विश्वास आपल्याला जगण्याचं बळ देतो.
@poeticanchor_ash
अश्विनी कुलकर्णी
21/07/2023



Leave a comment