काही नाती अशा असतात…
ज्या नकळत बनतात,
शब्दांच्या वाऱ्या सारख्या,
मनाच्या गाभ्यात घर करतात.
न काही अपेक्षा, न कुठला हक्क,
फक्त आपुलकीचा असतो स्पर्श जसा निःशब्द.
कधी हसवतात, कधी समजून घेतात,
कधी नकळत अश्रूंशीही संवाद साधतात.
हे नातं नाव नसलेलं,
तरीही हृदयाच्या कोपऱ्यात जपलेलं,
कधी सोबत चालत, कधी दूरून पाहत,
श्वासांसारखं सतत जवळ असलेलं.
अशा नात्यांची किंमत शब्दात नाही मावणार,
ती फक्त हृदयातच जाणवणार..
अश्विनी कुलकर्णी
11/03/2025



Leave a comment