“कधीकधी शब्दांपेक्षा नजराच जास्त बोलून जातात… अवचित जुळलेल्या अशाच एका सुंदर नात्याचा हा काव्यप्रवास.”
कळेना मला व्यथा या मनाची, जुळली कशी नाती मना-मनाची…
अवचित भेटल्या नजरा जेव्हा, शब्दांतून आकारली प्रीत भावनेची.
मी सावरता सावरता पुन्हा का सावरले? तुझ्याच पावलांचे ठसे मनी उमटले.
आता ही दाटलेली हूरहूर सांगू कोणाला? जेव्हा पापण्यां आड फक्त तूच स्वप्न बनून उरले.
हवीहवीशी वाटते आता तुझी ही साथ, हाती असू दे कायम तुझाच हा हात.
शब्दांतून मांडले मी हे गुपित मनाचे, अशीच राहू दे आपल्या प्रेमाची ही रात.
जपून ठेवेन मी ही तुझी प्रीती, जशी जपते दिव्यातील मंद वाती.
तूच सखा माझा, तूच माझे सर्वस्व, अशीच राहू दे कायम आपल्या प्रेमाची ही नाती.
@poeticanchor_ash
अश्विनी कुलकर्णी
22/01/2026



Leave a comment