काही नाती नशिबाच्या पानांवर पूर्ण होत नाहीत, पण ती लेखणीच्या शाईत कायमची कोरली जातात. प्रेम म्हणजे फक्त सहवास नसतो, तर एकमेकांपासून दूर राहूनही श्वासात जपलेली ती ओढ असते. शब्दांत व्यक्त न झालेली पण डोळ्यांतून ओघळलेली ही एक अशीच प्रेमभक्ती…
कळली नाही त्या मनाला, या मनाची व्यथा,
तरीही रचत गेली, आमच्या प्रेमाची कथा.
अबोल राहिले शब्द ओठी, डोळ्यांतून पाझरले,
न सांगताही नाते आपले, श्वासात मात्र उरले.
नशिबाच्या या वळणावर, भेट आपली अधुरी ठरली,
पण कागदावरच्या शब्दांनी, आपली साथ मात्र जपली.
काळ पुढे गेला, पण क्षण तिथेच थांबले,
आठवणींच्या दोरीवर, मन स्वप्नांत गुंफले.
नशिबात नसले तरी, ही लेखणी मात्र साक्षी आहे,
कधीतरी त्या मनालाही, जाणवेल ही प्रेम भक्ती आहे.
@poeticanchor_ash
अश्विनी कुलकर्णी
25/03/2026




Leave a comment