एक आवाज, एक क्षण, आणि एक गूढ शांतता…
किती दिवसांनी तुझ्याशी बोलले मी काल,
शब्द नव्हते भारी… तरी मन झालं हलकं, जड, हाल.
तुझ्या आवाजात भूतकाळाची एक ओळख होती,
आणि माझ्या शांत उत्तरात, विरहाची खोल साद होती.
काही क्षणापुरताच तो संवाद जुळला,
जसा एखादा जुना धागा, हातातून निसटून पुन्हा सापडला.
तू तसाच.. थोडासा लांब, थोडासा ओळखीचा,
आणि मी?
मी तशीच.. आठवणीतून बाहेर पडायला नाकारणारी.
त्या काही शब्दांनी उगाच काही बदललं नाही,
पण मनात काहीसं पुन्हा जागं झालं तरी…
एखादं गाणं, जे केव्हाच थांबलं होतं…
पण सूर मात्र अजूनही श्वासात घर करून होतं…
कधी एकांतात त्या सूरांची थरथर जाणवते,
अन मन हळूच पुन्हा त्या क्षणात हरवते.
काल फक्त आवाज भेटला, क्षणभर…
पण त्या स्वरांच्या मागे अजूनही उभं असतं एक अपरिपूर्ण उत्तर.
अश्विनी कुलकर्णी
01/08/2025




Leave a comment